शरद पवार यांची प्रकृती स्थिर; आज मिळणार डिस्चार्ज
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान आज ब्रीच कँडी रुग्णालयातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे..पवार हे डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते.
डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याची प्रकृती कायम राहिल्यास त्यांच्यावर पुढच्या 15 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच ‘पवार साहेबांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्यानं त्यांच्या भेटीस जाण्याचं टाळावं, असं आवाहन नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना केलं आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. पवार साहेब फिट अँड फाईन आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला असल्याने या सात दिवसात पवारांच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितले . बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा .
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची आज डॉक्टरांनी तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी दिली. https://t.co/FcZIgu5bYc
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 3, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 3, 2021, 1:19 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY