शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, नवाब मलिक यांचं ट्वीट
मुंबई : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy hospital) रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या जवळपास 21 दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Symptomatic Gallstones) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे 30 मार्चला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर एण्डोस्कोपी (endoscopy) केली गेली. यानंतर 12 एप्रिलला शरद पवारांवर दुसरी शस्त्रक्रिया झाली होती. 15 दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावर झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया होती. त्यावेळी त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
नवाब मलिक यांचं ट्वीट
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
Update
Our party President Sharad Pawar saheb was admitted at Breach Candy Hospital in Mumbai last evening for a follow up procedure post his Gall Bladder surgery.
The procedure has been conducted and he is now recuperating in the hospital.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 21, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 12:47 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY