गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे ११ रुग्णांचा मृत्यू
नाशिक: राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने ११जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 10 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
रुग्णालयात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या पाइपमधून गळतीला सुरुवात झाली. आता हे पाइप कापून दुरुस्त करण्यात आले. परंतु, दुरुस्तीच्या कालावधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने काहींचा जीव गेला. रुग्णालयात 171 कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर होते. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 11 जणांच्या मृत्यूनंतर आणखी काही रुग्णांची अवस्था गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक पाहणीनुसार या गळतीमुळे 20 किलो लिक्विड ऑक्सिजन वाया गेले. सध्या रुग्णालयासह जिल्हा प्रशासनाकडून गळतीचा तपास केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार घेणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीने एकानंतर एक 11 जणांचा जीव घेतला. या लीकेजनंतर संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 2:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY