ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन
संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर आपल्या लोककलेच्या माध्यमातून पोहचविणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज निधन झाले आहे. त्या 82 वर्षाच्या होत्या. त्यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यांना करोनाचा संसर्ग झाला होता.
तुकाराम खेडकर यांनी कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड सुरू केला. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून काम करताना त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांताबाई सातारकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ‘सातारकर यांच्या अकस्मात मृत्यूने धक्का बसला आहे. त्यांनी आयुष्यभर कलेची पूजा केली. शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या मनोरंजनाचे व्रत त्यांनी सलग सात दशके सांभाळले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशा शब्दांत थोरात यांनी दुखः व्यक्त केले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 8:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY