काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. . ते 80 वर्षांचे होते. एकनाथ गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. आज (बुधवार, 28 एप्रिल) सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरु होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
अत्यंत साधी राहणी असलेले एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रिपदही भुषवलेले होते. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीमध्ये राहत असत. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांसोबत त्यांची चांगली ओळख होते. काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी दलित चळवळीशीही ते जोडले गेलेले होते. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ते 2 वेळा काँग्रेस खासदार म्हणून निवडूण आले होते.
Congress Party's senior leader, Ex-MP, Ex-Minister Eknath Gaikwad Ji passed away today.
My deepest condolences to his daughter and Education Minister of Maharashtra @VarshaEGaikwad, Gaikwad family and his friends/supporters. pic.twitter.com/FSBtScFAFX— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 28, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 28, 2021, 2:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY