Breaking News

नवी मुंबई विमानतळाच्या वादात राज ठाकरेंची उडी, पाहा काय म्हणाले राज ठाकरे?

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 21, 2021 4:06 pm
|

मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे की दि. बा. पाटलांचे. हा राजकीय वाद रंगला असून राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि. बा. पाटलांचे नाव देण्याची मागणी पुढे करण्यात आली. या वरून वाद सुरू झाला असून राज ठाकरे या वादात उतरले आहेत. विमानतळाला नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे द्या. त्यांच्या नावापेक्षा कोणाचे नाव मोठे असू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान , आज या प्रश्नी आमदार प्रशांत ठाकूर एका शिष्टमंडळासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला गेले होते. यावेळी ठाकूर यांनी नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे.

राज ठाकरे म्हणाले, की “विमानतळ हे काही सिडकोने मंजूर केलेले आणि राज्याने प्रस्तावित केलेले आहे असे नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब ठाकरे किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठेपणाबद्दल दुमत नाही, तसेच नावावरून राडे करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून विमानतळाचं काम कसं लवकर पूर्ण होईल यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा. लोकं केवळ या नामांतराच्या मुद्द्यावर गुंतून राहतात पण ते दुर्देवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच आता छत्रपतींच्या नावापुढेही कोण आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरते ते बघू असे सांगत राज ठाकरेंनी प्रसंगी उद्धव ठाकरेंशी बोलेन. पण यामध्ये काही विषय दिसत नाही असे स्पष्ट केले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 21, 2021, 4:06 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *