उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
सिंधुदुर्ग : तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपुर्वी कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचं आता समोर आलं आहे.
21 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 मे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत रत्नागिरीत पोहोचले होते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आपल्यावर लक्ष ठेवा असं उदय सामंत फडणवीसांना म्हणाल्याचं समजतंय . त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे .
निलेश राणे यांचा गौप्यस्फोट
माजी खासदार निलेश राणे यांनीच सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. “तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली,” असा निलेश राणे यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 25, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 12:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY