भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये EVM:निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना केले निलंबित , प्रियांका गांधी म्हणाल्या,..
आसाम विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वादाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान , निवडणूक अधिकारी कारमध्ये EVM घेऊन जात असतांना भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले. यात एका पीठासीन अधिकाऱ्याचाही समावेश आहे. गुरुवारी मतदानानंतर करीमगंज जिल्ह्यात भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशीन नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर यावरून हिंसाचार घडल्याचंही पाहायला मिळालं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, करीमगंज जिल्ह्यातील रताबारी विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर पोलिंग टीम ईव्हीएम घेऊन जात असताना कार खराब झाली. मतदान पथक स्ट्रॉंग रूमकडे जात होते. कार खराब झाल्यानंतर पथकाने निवडणूक आयोगाकडे आणखी एका कारची मागणी केली. मतदान अधिकाऱ्यांना दुसर्या कारची व्यवस्था करण्यास सांगितले गेले होते. परंतु तोपर्यंत त्यांनी भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट घेतली.
यावर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही अनेक ट्वीट करून निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, माध्यमांच्या वृत्तानुसार, आसाममध्ये 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. 39 जागांसाठी 74.64% मतदान झाले. पहिल्या टप्प्यात येथे 72.14% मतदान झाले होते.वृत्तसंस्था एनआयएच्या हवाल्यानुसार, पाथरकांडी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवले होते. लोकांचे म्हणणे होते की, ही गाडी निवडणूक आयोगाची नव्हती. परंतु, सुत्रांच्या माहितीनुसार, EC च्या गाडीत बिघाड झाल्यामुळे जवळून जाणाऱ्या गाडीला त्यांनी लिफ्ट मागितली होती. दरम्यान ती गाडी एका भाजप उमेवाराची असून यावरदेखील जमावांकडून हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
https://twitter.com/atanubhuyan/status/1377684745023221765
तर चौकशीत सर्व ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित सापडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचा सील तोडलेला नाही. आयोगाने नमूद केले की, ईव्हीएमसह बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट हे सुरक्षित कक्षात जमा करण्यात आले होते. परंतु, खबरदारी म्हणून पोलिंग स्टेशन रताबारी विधानसभा सीटचे इंदिरा एम.व्ही शाळेच्या मतदान केंद्राच्या 149 क्रमांकावर पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाबाबत विशेष पर्यवेक्षकाकडून अहवालही मागविण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी गुवाहाटीतील एका पत्रकाराने भाजप नेत्यांच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा व्हिडिओ ट्विट केला. कारमध्ये ईव्हीएम सापडल्यावर मोटारीला जमावाने घेरले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 2:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY