सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह;, नागपूरात हॉस्पिटलमध्ये दाखल
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर नागपूर येथील किंग्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. भागवत यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal symptoms and admitted to Kigsway hospital Nagpur.
— RSS (@RSSorg) April 9, 2021
आरएसएसने आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज दुपारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्यात सध्या कोरोनाची सामान्य लक्षणे आढळून आली आहेत. खबरदारी म्हणून त्यांना नागपूरच्या किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मोहन भागवत यांनी 7 मार्च रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. यावेळी भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
भागवत यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत के कोरोना पॉजीटिव होने की खबर मिली। उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले ईश्वर से यही कामना करता हूं।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 9, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 10, 2021, 1:52 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY