आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचं ट्विट केलं डिलीट ,संजय राऊत यांची यावर प्रतिक्रिया, वाचा
मुंबईः येत्या 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाचे लसीकरण केले जाणार आहे. यात अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकार देखील मोफत लसीकरण (Free COVID Vaccination) जाहीर करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. मात्र काही वेळानंतर ते ट्विट डिलीट केले. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरण करण्यासाठी टेंडर काढणार अशा स्वरुपाचे ट्वीट केले आहे. यामुळे राज्यात कोणत्या दिवसापासून मोफत लसीकरण सुरू होणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
राज्यातील१८वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे.
–@nawabmalikncp pic.twitter.com/ujt8E7P5xf— Office of Nawab Malik (@OfficeofNM) April 25, 2021
यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,”करोना संकटाचा सामना धैर्याने केला जात असून मुंबईतही डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत करोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला तरच संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत आहेत,” ”हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
काय होते आदित्य ठाकरे यांचे ट्विट:
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबतचे एक ट्विट केले होते. परंतु, त्यांनी काही काळानंतर हे ट्वीट डिलीट केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच लसीकरणाबाबत अधिकृत धोरण समितीद्वारे घोषाण केली जाणार आहे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे
I have deleted the earlier tweet as to not cause confusion regarding the official vaccination policy of Maharashtra that would be fully ensuring fast, efficient vaccination and would leave nobody behind.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 25, 2021
डीलीट केलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 1:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY