Breaking News

जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही: संजय राऊत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 27, 2021 1:23 pm
|

मुंबई :देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. रुग्णवाढीचा दर भयावह असून सर्वस्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. ‘कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा चिमटा त्यांनी यावेळी केंद्र सरकारला काढला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक रुग्ण संख्या आहे. लसींचा तुटवडा असो किंवा रेमडेसिविरच्या पुरवठा यावरून राज्य सरकारने (State Government) केंद्र सरकार (Central Government )सह पंतप्रधान मोदींना घेरलं होतं. परंतु शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मोदींच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी(Prime Minister) आणि देशाची बदमानी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील सत्ताधाऱ्यांना, भारत सरकारला अपयश आले आहे. या कारणांवरुन जागतिक स्तरावरुन भारत सरकार (Indian Government) वर टीका केली जात आहे. अनेक जागतिक माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पण, देशाची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत, असं लक्षवेधी वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता समन्वय असून,मोदींनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी त्यांनी धोरण आखलं आहे. तर ते मद्रास न्यायालयाने केलेल्या टीप्पणीचा गांभीर्यानं विचारही करतील, असंही राऊत यावेळी म्हणाले. मद्रास उच्च न्यायालयाप्रमाणेच कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे आम्हीही सांगत होतो असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या टीपण्णीला दुजोरा दिला आहे. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे की निवडणुका, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 27, 2021, 1:23 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *