सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठे घडविण्याची योजना होती! – एनआयए
मुंबई : सचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आज NIA च्या विशेष न्यायालयाने सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मात्र, आता एक नवी माहिती समोर आली आहे.दरम्यान, अँटिलिया स्फोटके प्रकरणाच्या तारा खूप खोलवर विस्तारलेल्या आहेत. कारण सचिन वाझे हा अँटिलिया समोरे स्फोटके भरलेली गाडी पार्क केल्यानंतर काहीतरी मोठे प्लॅनिंग करत होता, अशी माहिती मिळाल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.असा खुलासा केल्याने या प्रकरणाचे धागोदोरे बरेच खोलवर असल्याचेही स्पष्ट होत आहे.Sachin Waze was planning another big act after explosive planting near Antilia in Mumbai, says NIA sources
Sachin Waze was planning another big act after explosive planting near Antilia in Mumbai. We are ascertaining if Pradeep Sharma provided logistics support. Param Bir Singh's statement has been recorded as a witness not as a suspect: NIA sources
— ANI (@ANI) April 9, 2021
सचिन वाझेला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी लॉजिस्टिक सपोर्ट दिला का, याचा तपास एनआयए करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे स्टेटमेंट साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येत आहे, संशयित म्हणून नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासाही एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून सचिन वाझेंसह अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. त्याचे कोणतेही खुलासे एनआयएने आत्तापर्यंत केलेले नाहीत.
सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमध्ये दर्शन घोडावत – अजित पवारांचेही नाव;बेकायदा गुटखा उत्पादक – विक्रेत्यांकडून १०० कोटींची वसूली आणि बरेच काही!!
एनआयए सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडूनच एवढ्या गंभीर स्वरूपाचे खुलासे झाल्यानंतर मुंबईत काही मोठी घटना घडणार होती, या संशयाला बळकटी मिळाली आहे. त्याचबरोबर आणखी बरेच मोठे मासे संशयाच्या घेऱ्याबरोबरच तपासाच्या घेऱ्यात येणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 8:52 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY