Breaking News

प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 16, 2021 6:30 pm
|

मुंबई: सध्या ईडी किंवा सीबीआयची टांगती तलवार राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेतेमंडळींवर आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुख यांनी ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक या नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांसारख्या मंत्र्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पदाचा गैरवापर करून स्वत:ची मालमत्ता उभी केल्याचे आरोप केले आहेत. तशातच आता सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भ्रष्टाचाराने आरोप केले आहेत. “जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या लॉकडाउन काळात सारं काही बंद असताना सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कलमे याच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला. SRA, म्हाडा अशा विविध ठिकाणी कलमेने आव्हाडांसाठी वसुली केली असून तो आव्हाडांचा सचिन वाझे आहे”, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केला.

लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद RTI कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ६ दिवसांमध्ये ८१ प्रकल्पांचे तातडीने अहवाल का मागवण्यात आले? आव्हाड आणि कलमे यांचे संबंध काय आहेत?, असे प्रश्न भाजपचे किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले. आव्हाडदेखील कोविडमधून काही दिवसांपूर्वीच बरे होऊन बाहेर आले होते. कोविडमधून बरे झाल्यावर लगेचच त्यांनी प्रविण कलमेच्या मार्फत ६ जुलै २०२० रोजीच्या एका दिवसात केलेल्या ८१ एसआरए प्रकल्पांची संपूर्ण माहितीची मागितली. तसेच, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मध्ये कलमे यांच्यासोबत ताबडतोब संयुक्त बैठक घ्या आणि अर्जदार कलमे यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या अभियंतासह संयुक्त पाहणी व भेट द्या. तसेच, SRA नियम अंतर्गत १ जानेवारी २००५ पासून मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती द्या, असे आदेश दिले. गृहनिर्माण मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे SRA ने रोडवे 2 प्रमाणे 31 प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्याचे वेळापत्रक बनवले व अनेक ठिकाणी संयुक्त पाहणीही केली. तसेच, या गोष्टीचा मंत्र्यांच्या कार्यालयातून नियमित पाठपुरावा केला जात होता. या संबंधीची सगळी माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 16, 2021, 6:30 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *