..आता पेट्रोलच्या दरानेही शंभरी ओलांडली…या दरवाढीचं करायचं काय? रोहित पवारांनी नागरिकांना विचारला प्रश्न
मुंबई: आज महाराष्ट्रात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सलग दुस-या दिवशी वाढ झाली आहे. goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पेट्रोलचा दर 98.12 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर डिझेलचा दर 89.48 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर नांदेड, परभणी या जिल्ह्यांत पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. ही दरवाढीमुळे महाभाईचा विस्फोट झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने भाजीपाला, फळे, धान्ये यांसारख्या गोष्टी देखील महागणार आहेत. त्यामुळे ही इंधनदरवाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगला चाप बसवणारी आहे.
ते म्हणाले, ‘क्रिकेटमध्ये शतक झालं की आपण टाळ्या वाजवून खेळाडूचं अभिनंदन करतो. एखाद्यानं वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही अभिनंदन करतो. आता पेट्रोलच्या दरानंही शंभरी ओलांडली आहे. या दरवाढीचं करायचं काय?,’ सा सवाल त्यांनी केला आहे. ‘कमेंटमध्ये तुम्हीच सांगा,’ असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.याआधी पश्चिम बंगालसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतरही रोहित पवार यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती.
क्रिकेटमध्ये शतक झालं की आपण टाळ्या वाजवून खेळाडूचं अभिनंदन करतो..
एखाद्याने वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही अभिनंदन करतो..
आता पेट्रोलच्या दरानेही शंभरी ओलांडली…
या दरवाढीचं करायचं काय?
कमेंटमध्ये तुम्हीच सांगा!#PetrolDieselPriceHike
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 11, 2021
दरम्यान, देशातील सर्व राज्यांमध्ये विकलेल्या जाणाऱ्या इंधनाचे दर थोड्या अधिक प्रमाणात अशाच प्रकारे वाढतात. ज्याचा थेट बोजा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो. ज्यामुळे महागाई वाढते आणि सर्वसामान्यांचा त्रासही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 2:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY