केरोसिनचे सुधारित दर 1 जून पासून लागू
मुंबई, : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे दरासंदर्भात माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. मुंबईसाठी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक 01 जून 2021 पासून लागू करण्यात येतील.
किरकोळ विक्रीचा सध्याचा दर (रुपये प्रति लिटर) 36.87 इतका तर सुधारीत दर 39.45 इतका आहे. शासन परिपत्रक क्र. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक – केईआर-1376/3769/सतरा, दि. 17 डिसेंबर 1976 नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.अशी माहिती कैलास पगारे, संचालक, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 23, 2021, 5:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY