पीएम मोदींची कोरोनावर उच्चस्तरीय बैठक:पंतप्रधान म्हणाले – कोरोना आकडेवारीची पारदर्शकपणे नोंदवा; ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा करा
नवी दिल्ली: ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभरात कोविड-19 बाबत आढावा आणि कोरोना लसीकरणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत पंतप्रधानांनी देशामध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आणि लसीकरण व कोव्हिड चाचणी प्रक्रिया वेगवान करण्यास सांगितले. तसेच आतापर्यंत वापरल्या गेलेल्या राज्यांमध्ये केंद्राने पाठविलेले व्हेंटिलेटर बसवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत . या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हाय पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या परीसरांमध्ये टेस्टिंग वाढवण्यात यावी. त्यांनी गावात कोरोनाची प्रकरणे वाढण्यावर चिंता व्यक्त केली. तसेच गावांमध्ये डोर-टू-डोर टेस्टिंग आणि सर्व्हिलान्सची व्यवस्था करावी. या व्यतिरिक्त त्यांनी व्हेंटिलेटर्सचा वापर होत नसल्यावरही नाराजी व्यक्त केली.
Delhi: PM Narendra Modi chaired a high-level meeting on the #COVID19 related situation and vaccination today. pic.twitter.com/pbrMdJtSRy
— ANI (@ANI) May 15, 2021
बैठकीदरम्यान सांगण्यात आले की, मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात जवळपास 50 लाख टेस्ट केले जात होते. जे एप्रिलमध्ये वाढून प्रत्येक आठवड्यात 1.3 कोटी टेस्ट करण्यात आले आहेत. या दरम्यान त्यांनी ग्रामीण परिसरांमध्ये ऑक्सिजनच्या योग्य पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी हे देखील म्हटले की, आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणांना ऑपरेट करण्यासाठी ट्रेनिंग दिली जावी.
PM Narendra Modi chairs a high-level meeting on the #COVID19 related situation and vaccination. pic.twitter.com/4VQ1trKJXs
— ANI (@ANI) May 15, 2021
बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या गोष्टी
कोरोना आकडेवारीची पारदर्शकपणे नोंदवा…
लोकल कंट्रोल स्ट्रॅटेजी ही काळाची गरज आहे, खासकरून ज्या जिल्ह्यांमध्ये टीपीआर जास्त आहे. आरटी-पीसीआर आणि वेगवान चाचण्यांचा वापर करून चाचणीत आणखी वाढ करण्यात यावी, खासकरून उच्च चाचणी सकारात्मकतेचे प्रमाण असलेल्या भागात व्हावी.राज्यांना त्यांच्या प्रयत्नांवर प्रतिकूल प्रभाव होईल असे वाटू न देता रुग्णसंख्या व इतरआकडेवारी पारदर्शक पद्धतीने नोंदवली पाहिजे.
घरोघरी जाऊन चाचणी व देखरेखीसाठी सूचना
पंतप्रधानांनी ग्रामीण भागात आरोग्य संसाधने वाढवून घरबसल्या तपासणी व देखरेखीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांना सर्व आवश्यक उपकरणांसह सक्षम करण्याबद्दल सांगितले. पंतप्रधानांनी सुलभ भाषेत मार्गदर्शक सूचनांसोबतच ग्रामीण भागात घरगुती विलगीकरण आणि उपचार उपलब्ध करण्यास सांगितले.
ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठ्याचे निर्देश
ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एक वितरण योजना तयार केली जावी, ज्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचीही तरतूद असावी. अशा उपकरणांच्या संचालनात आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण प्रदान केले जावे. अशा वैद्यकीय उपकरणांच्या सुयोग्य संचालनासाठी विजेचा पुरवठा सुनिश्चित केला पाहिजे.
राज्यांकडून व्हेंटिलेटरचा योग्य वापर नाही
काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याच्या काही बातम्यांना पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतले आणि केंद्र सरकारने पुरविल्या गेलेल्या व्हेंटिलेटरच्या स्थापनेचे व संचालनाचे त्वरित ऑडिट करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान म्हणाले की, आवश्यक असल्यास आरोग्य कर्मचार्यांना व्हेंटिलेटर व्यवस्थित चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे.
पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या भारताच्या लढाईला शास्त्रज्ञ व विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्गदर्शन कायम राहील. लसीकरण प्रक्रिया आणि 45+ लोकसंख्येच्या राज्यनिहाय व्याप्तीविषयी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भविष्यात लस उपलब्ध होण्याच्या रोडमॅपवरही चर्चा करण्यात आली. लसीकरणाला गती देण्यासाठी राज्यांनी अधिकाधिक लक्षपूर्वक काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 6:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY