Breaking News

#Remdesivir सगळ्यांनाच देता येत नसल्याने खूप अपराध्यासारखं वाटतं: रोहित पवार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 4:52 pm
|

मुंबई : राज्यात कोरोना संक्रमनाच्या नवीन लाटेमुळे रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स आणि अन्य अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिलीय .

रोहित पवार यांनी म्हटलंय , #Remdesivir साठी दररोज असंख्य फोन येतायेत आणि या सगळ्यांनाच ते देता येत नसल्याने खूप अपराध्यासारखं वाटतं. ही भावना मनाला काही सहन होत नाही अशी खंत व्यक्त केलीय. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने तातडीने हे औषध उपलब्ध करून द्यावं. नाहीतरी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ‘काहीही’ करा! मग कोर्टाचं तरी ऐका! असे म्हणत केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतलाय .

देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असताना त्याकडं दुर्लक्ष करत भाजप मात्र #CBI #ED यांसारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरुन आपला गमावलेला महाराष्ट्राचा ‘राजकीय ऑक्सिजन’ मिळवण्याचा प्रयत्न करतंय. त्यांचे नेते बोलतात आणि काही दिवसांतच तशी कारवाई होते. याचा अर्थ स्पष्ट आहे ,अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपली प्रति क्रिया व्यक्त केली आहे

राज्यातील सत्ता गेल्याच्या दुःखातून ते अजूनही सावरले नाहीत. असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पण त्यांना माझी विनंती आहे, की आज लोकांना #Oxygen, #Remdesivir, #vaccine मिळत नसल्याने लोक अडचणीत आहेत. त्यामुळं स्वतःच्या राजकीय दुःखाकडं लक्ष न देता अडचणीतील जनतेचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, ते तुमचं कर्तव्य आहे.असेही पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान , शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. , सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी सांगितले की, देशात ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे देशभरात आरोग्य विषयक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अत्यावश्यक सेवांच्या संबंधित पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. सर्वोच्च न्यायालय ऑक्सिजनचा पुरवठा, अत्यावश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरण आणि लॉकडाऊन आदी बाबींचा विचार करत सरकारला फटकारले होते .


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 4:52 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *