दिलासादायक :राज्यात ७४ हजार ४५ जण मागील २४ तासांत कोरोनामुक्त
मुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, दोन माहिन्यात बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच होती. शुक्रवारची (ता.२३ ) आकडेवारी मात्र थोडी दिलासादायक आहे. कारण एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असून मागील २४ तासांत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ७४ हजार ४५ जण बरे झाले आहेत. या महिन्यात प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हा कल काही दिवस कायम राहिल्यास, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. तर राज्यात २४ तासांत ६६ हजार ८३६ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच राज्यात २४ तासांमध्ये ७७३ कोरोना मृत्यू झाले. 66 thousand 836 new covid19 cases in maharashtra
दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.५३ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५२ टक्के आहे. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८१.८१ टक्के आहे. राज्यात सध्या ४१ लाख ८८ हजार २६६ जण होम क्वारंटाइन तर २९ हजार ३७८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात काय ?
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७२ रुग्णांचा मृत्यू
नवीन ७२२१रुग्ण सापडले आहेत.
राज्यात दिवसभरात काय ?
दिवसभरात ७७३ मृत्यू
कोरोनाचे ६६ हजार ८३६ रुग्ण आढळले
७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले
एकूण बाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६
एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण बरे होऊन घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८१ टक्के
कोरोना मृत्युदर १.५२ टक्के
चाचण्या आणि निष्कर्ष
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 12:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY