“बोलघेवडे, कांगावाखोर…,” रोज सकाळी उठून कांगावा करु नये; फडणवीसांचा राऊतांना टोला
मुंबई – देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राकडे अनेक राज्ये मदत मागत असून यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी प्रामुख्याने करत आहेत. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रातही मोठी समस्या असून मदतीवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी कालच्या मन की बात मध्ये केंद्राने सर्व पात्र भारतीयांचे मोफत लसीकरण करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्याबाबत काही प्रश्नच उरत नाही. मात्र जे बोलघेवडे आणि कांगावाखोर नेते सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, रेमडोसिवीरच्या दहा दिवसांतील १६ लाख उत्पादनापैकी ४ लाख रेमडेसिवीर महाराष्ट्राला दिले आहेत. इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला जास्त रेमडेसिवीर मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे १७५० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात आला आहे. इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. आजही हवाई दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये, अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, ज्या राज्यांना आपल्याबाजूने वेगाने लसीकरण करायचे असेल त्यांनी लस खुल्या बाजारातून खऱेदी करावी आणि आपल्या तर्फे लसीकरणाचा वेग वाढवावा. त्याशिवाय १ तारखेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी स्पष्ट धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे देखील सांगितले. अनेक लोकांचे या टप्प्यात लसीकरण होणार असल्याने गर्दीची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.त्या बरोबरच पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता महाविकास आघाडीने देखील लसीकरणाबाबत एकवाक्यता ठेवावी. असा टोला देखील त्यांनी यावेळी सरकारला लगावला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 1:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY