आजच्या डिजीटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली – नाना पटोले
‘माजी पंतप्रधान राजीव गांधी हे देशाचे भारतरत्न , दूरदृष्टीचे असलेले नेते होते. परंतु, त्यांच्याकडे केवळ पदवीच नव्हती तर त्यांनी या देशातील तरुणांना प्रेरणा देण्याची भूमिका राजीवजींची होती. देशाला पुढे नेहण्याची भूमिका त्यांची होती. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान कसे प्राप्त होईल याकडे त्यांचा दृष्टिकोन होता’, आजच्या डिजीटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली होती. अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिली आहे.
दरम्यान ,माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून 111 अॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात 61 लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष शाम पांडे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
तसेच राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मास्क व सॅनिटीझरचे वाटप करण्यात आले.तर धारावी येथील ९० फिट रोड परिसरातील काँग्रेस कार्यालयात भारतरत्न स्व. राजीव गांधी जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. राजीव गांधी साहेबांच्या स्मृतींना स्मरून संत रोहिदास हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने मास्क व सॅनिटीझरचे वाटप करण्यात आले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 21, 2021, 6:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY