नाशिक दुर्घटनेवरुन राज ठाकरे संतापले, म्हणाले…
नाशिक: राज्यात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना ICU बेड उप्लब्ध होत नाहीत. अशात आता ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळता सुरु झाली आहे. या रुग्णालयात तब्बल 150 रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 जण व्हेंटिलेटरवर होते. त्यातल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत शोक व्यक्त करत दोषींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे.
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवे, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 5:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY