राहुल गांधींनी उडवली केंद्राच्या उपाययोजनांची खिल्ली, म्हणाले- केंद्राची रणनीती म्हणजे तुघलकी लॉकडाऊन लगाओ, घंटी बजाओ!
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्वीट करून केंद्र सरकारच्या कोरोना रणनीतीवर टीका केली. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या तीन रणनीती आहेत. पहिली- तुघलकी लॉकडाऊन लगाओ. दुसरी- घंटी बजाओ आणि तिसरी- प्रभु के गुण गाओ. तथापि, केंद्रावर टीका करण्याची राहुल गांधींची ही पहिलीच वेळ नाही. कोरोनाविरुद्ध लढाईत केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर पहिल्यापासूनच राहुल गांधींनी आक्रमक होत टीका केली आहे.
केंद्र सरकार की कोविड रणनीति-
स्टेज 1- तुग़लक़ी लॉकडाउन लगाओ।
स्टेज 2- घंटी बजाओ।
स्टेज 3- प्रभु के गुण गाओ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 16, 2021
त्याचवेळी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्वीट करून लोकांना आवाहन केले की, ‘प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांसाठी हा मोठा त्रास देणारा काळ आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांनो, आजूबाजूचे लोक कोरोना साथीच्या आजारातून जात आहेत. ‘आपण मास्क लावा आणि कोविड सेफ्टीशी संबंधित सर्व सूचनांचे पालन करण्याची विनंती आहे. आपण सावधगिरीने कोरोना मात करून हे युद्ध जिंकले पाहिजे असे म्हटले आहे.
प्यारे देशवासियों,
ये हम सबके लिए बहुत संकट का समय है। हम सबके प्रियजन, परिवारजन, आस-पास के लोग कोरोना महामारी के चपेट में आ रहे हैं।
आप सब से निवेदन है कि मास्क लगाएं एवं कोविड सुरक्षा संबंधी सभी निर्देशों का पालन करें। सावधानी व संवेदना के साथ हमें मिलकर इस जंग को जीतना होगा।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 16, 2021
दरम्यान , भारतात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 15 लाखांच्या पार झाली आहे. आता येथे 15 लाख 63 हजार 588 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश आहे. यावरुन आपण देशातील कोरोनाच्या कहराचा अंदाज लावू शकतो. या यादीमध्ये पुणे टॉपवर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी परिस्थिती आहे की, देशात जवळपास 120 जिल्ह्यांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांचा तुटवडा आहे.
महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेशात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत गुरुवारी देशात सर्वात जास्त 61,695 नवीन रुग्ण महाराष्ट्रात सापडले. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. येथे 22,339 लोक संक्रमित आढळले आहेत. दिल्लीमध्ये 16,699, छत्तीसगडमध्ये 15,256, कर्नाटकात 14,738 आणि मध्यप्रदेशात 10,166 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 3:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY