पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्सिजन आणि कोरोना लसीसह गायब : राहुल गांधी
नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढत असलेल्या कोरोनामागे मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुका आणि कुंभ मेळा जबाबदार आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमधून सिद्ध झाले आहे. कोरोनाबाबत WHO कडून बुधवारी जारी अपडेटमध्ये सांगण्यात आले. दरम्यान, यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्राला लगावला आहे.
आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर जीएसटी आणि पंतप्रधानांचे फोटो शिल्लक असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींनी म्हणतात की, “देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय ते फक्त सेंट्रस विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचे फोटो.”
वैक्सीन, ऑक्सीजन और दवाओं के साथ PM भी ग़ायब हैं।
बचे हैं तो बस सेंट्रल विस्टा, दवाओं पर GST और यहाँ-वहाँ PM के फ़ोटो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 13, 2021
राहुल गांधींनीही बुधवारी ट्विट केले होते की, ‘रोज वाईट बातम्या सतत येत आहे. मूलभूत समस्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. या महामारीत आमचे देशवासीय किती काळ केंद्र सरकारचे क्रौर्य सहन करतील? ज्यांची जवाबदारी आहेत ते कुठे लपले आहेत. ते म्हणाले , कोरोना संकटाच्या काळात लस, ऑक्सिजन आणि औषधांचा सतत तुटवडा आहे. त्यावर सरकार के उपाययोजना करणारआहे असे म्हटले आहे.
दरम्यान ,देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 12:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY