Covid19 Vaccination : राज्यात अनेक लसीकरण केंद्र बंद! अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगाच रांगा
मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असताना दिसत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. अशातच राज्यात लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागरिकांकडून दिला जात असून मात्र सध्या लसीचे डोस संपले आहे. त्यामुळे राज्यातील विविध लसीकरण केंद्रे डोस अभावी बंद करावी लागली आहेत. त्याचसोबत लसीकरण केंद्रांनी गेटवरच लसीचे डोस संपल्याचे बोर्ड लावले आहेत. यामुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये केवळ 160 लसीचे डोस शिल्लक असल्याचे डीन राजेश डेरे यांनी म्हटले .. बिकेसी लसीकरण केंद्रात 160 लोकांना आत सोडले तर बाकी लोक रांगेत बाहेर उभे होते. त्यांना स्टॉक शिल्लक नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ज्येष्ठ नागरिकही बाहेर रांगेत ताटकळत होते. काहीनी संताप व्यक्त केल्यानंतर सूचना लावण्यात आली की, साठा शिल्लक नाही. त्यामुळे लोकांचा प्रचंड संताप झालेला पाहायला मिळाला.
Mumbai: People gather outside BKC Jumbo vaccination Centre as the centre runs out of #COVID19 vaccine doses. pic.twitter.com/1OvGKdZ2yO
— ANI (@ANI) April 9, 2021
दरम्यान, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीची गंभीर स्थिती निर्माण झाली असून त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. लसीचा तुटवडा असल्याने पहिल्या लसीचा डोस घेतलेल्यांना दुसरा डोस सुद्धा घेता येणार नाही आहे. त्याचसोबत खासगी रुग्णालयांच्याबाहेर सुद्धा कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याने त्या संदर्भात बोर्ड लावले आहेत.
तर 7 एप्रिल पर्यंत 15.52 लाख लसीचे डोस अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्ससह अॅडमिनिस्ट्रेट मधील लोकांना दिले गेले. त्यापैकी आता 1.72 लाख जणांना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देणे राहिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाच्या लसीचे डोस संपल्याने लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत.
बिकेसी लसीकरण केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं, महाराष्ट्रातली पहिली लस इथेच दिली गेली होती. तसेच मोहीम येथील महिला स्पेशल लसीकरण केंद्रातला साठा संपला आहे. ८ मार्च महिला दिनी हे सेंटर सुरु करण्यात आलं होते. तर धारावी लसीकरण केंद्रातही लसींचा साठा संपण्याच्याच मार्गावर आहे. केवळ 170 डोस शिल्लक होते. लसीचा पुरेसा साठा नसल्यानं अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत मुंबईसाठी 1 लाख 46 हजार डोस पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटमधून येण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 6:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY