माजी इंटेलिजेंस कमिश्नर रश्मी शुक्ला यांना समन्स, चुकीच्या पध्दतीने फोन टॅपींग प्रकरणी होणार चौकशी
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला आता वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले असून मुंबई सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावले आहे. बुधवारी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. रश्मी शुक्ला या एसआयडी विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. या वेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांना पाठविण्यात आलेले समन्स हे महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई सायबर सेल विभागाने (Mumbai Police Cyber Division) पाठवले आहे. येत्या 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात मुंबई सायबर विभागाचे एक पथकही दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. हे समन्स हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने पाठविण्यात आले असून, ते रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी धाडण्यात आले आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कथीत फोन टॅप प्रकरणावरुन महाराष्ट्र आणि दिल्लीच्याही राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली. तर विरोधी पक्षानेही दिल्लीवाऱ्या करत हे प्रकरण तापविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंद लिफाप्यात काही कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह दिल्याचे फडणवीस यांनी स्वत:च सांगितले.
दरम्यान, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. जेव्हा फोन टॅपिंग झाले तेव्हा सीताराम कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी आपल्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचे कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तसेच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचेही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 12:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY