अदर पुनावाला यांची मागणी नसताना केंद्रानं सुरक्षा का पुरवली? नाना पटोले यांचा सवाल
मुंबई : देशात कोरोना महामारीचा कहर कायम आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला आपल्या कुटुंबासमवेत लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये पुनावालांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर खूप प्रेशर असून काही बड्या राजकीय नेत्यांनी धमक्या दिल्याचे म्हटले होते. पुनावालांच्या याच वक्तव्याबाबत त्यांना सुरक्षा देण्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नाना पटोले यांनी म्हटले आहे की , भारतात अदर पूनावाला नसताना आणि राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज त्यांनी केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसे काय देऊ शकते? अशी विचारणा मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी केली आहे. यामागे काय लपले आहे हे वास्तव समोर आले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही पटोले म्हणाले आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लंडनमध्ये अदार पूनावाला म्हणाले की, मी आता भारतात येणार नाही. बड्या नेत्यांनी त्यांना धमकावले आहे. देशात कोणीही त्यांना हातही लावू शकणार नाही. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कॉंग्रेस घेईल. त्यांनी धमकावणाऱ्यांना समोर आणायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे .
टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्र्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा अदर पूनावाला यांनी केला आहे. यासंबंधी विचारण्यात आले असता, आपल्याला देशातील मोठ्या नेत्यांनी धमकावल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते असूच शकत नसल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले लसीच्या दरासंबंधी बोलताना म्हणाले की, देशातील निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्व जबाबदारी घ्यायला हवी होती. पण पंतप्रधानांनी राज्यांना जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यावेळी दर निश्चित करण्यात आले. पण जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही. पण मोदी है, तो मुमकीन है असेच दिसत आहे. रेमडेसिविर सरकारने खुल्या बाजारात आणले असते, तर काळाबाजार झालाच नसता असे देखील त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातील लोकांचे जीव जात आहेत. केंद्रातील सरकार सातत्याने लोकांच्या जीवाचे राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, सीरम प्रमुख अदर पुनावाला यांना गत आठवड्यातच वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. ते म्हणाले होते की, कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यावरून त्यांच्यावर खूप दबाव होता, त्यांना धमक्याही मिळत होत्या. याच कारणास्तव पुनावाला यांनी देश सोडून लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. नुकतेच केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने पूनावाला यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. तथापि, पुनावालांनी अद्यापही कोणत्याही नेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी जर नावे जाहीर केली, तर माझे शिर कापतील. पुनावालांच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 3, 2021, 2:08 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY