पेगासस प्रकरणी संसदेत सरकारची कोंडी, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांची घोषणाबाजी
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात आजही पेगासस हेरगिरी प्रकरणी गदारोळ सुरूच आहे. राज्यसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. राज्यसभेत काँग्रेस सदस्यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब करणे भाग पाडले.
Rajya Sabha adjourned till 12 noon amid sloganeering by Opposition MPs for a discussion on the 'Pegasus Project' report https://t.co/alwUIj4jSY
— ANI (@ANI) July 27, 2021
लोकसभेत काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि खासदार मणिक्कम टागोर यांनी आसाम – मिझोराम संघर्ष वरून स्थगन प्रस्ताव दिला . आसाम आणि देशभरातील काही पत्रकार, राजकारणी आणि इतर महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात आहे. यासाठी इस्रायली स्पायवेअर पेगाससचा वापर होत आहे. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृ,हमंत्री अमित शहा यांनी संसदेत हजर राहावे आणि त्यांच्या हजेरीतच या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली . पावसाळी अधिवेशनाचा एक आठवडा अशाच गोंधळात निघून गेला. आता दुसरा आठवडा सुद्धा वादळी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारची सर्व मुद्द्यांना उत्तरे देण्याची तयारी आहे. परंतु काँग्रेस आणि अन्य विरोधक सभागृहे चालू देत नाहीत त्यामुळे त्यांना उत्तरे मिळत नाहीत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले. परंतु काँग्रेसने संशोधित केलेली कोंडी सत्ताधारी भाजपला फोडता आलेले नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 27, 2021, 6:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY