अदर पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड प्लस संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूची लस बनविणार्या सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी होत आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. अदर पूनावाला सध्या ब्रिटन मध्ये आहेत आणि तेथून लवकर भारतात परतण्याची शक्यता नाही असे समजते.
A writ petition is filed in Bombay HC seeking Z plus security for Adar Poonawallah and his family. pic.twitter.com/cWsX1V6c0C
— ANI (@ANI) May 6, 2021
सिरम इन्स्टिट्यूट व सरकार नियमन कार्य प्रमुख प्रकाशकुमार सिंह यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना पत्र लिहून अदार पूनावाला याना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती.पूनावाला याना वाय-क्लास सुरक्षा देण्यात आली असून ते सध्या यूकेमध्ये आहे. पूनावाला यांनी देशात करोना प्रसार आटोक्यात येत नसल्याने लसीचे उत्पादन वाढवावे यासाठी त्यांच्यावर फार दबाब येत असल्यांचे सांगताना बडे नेते आणि राजकीय प्रभावी व्यक्तींकडून वारंवार धमक्या येत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यात त्यांनी शिवसेना नेत्यांचा उल्लेख केला होता. मात्र लसीचे उत्पादन एकाएकी वाढविणे शक्य नसते आणि ते एका व्यक्तीचे काम नाही असे पूनावाला यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाय दर्जाच्या सुरक्षेपेक्षा झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 6, 2021, 3:58 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY