अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन, बृहन्मुंबई पश्चिम यांनी जारी केले प्रसिद्धी पत्र
मुंबई, : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी (पु.), मुंबई-60 यांचे कार्यक्षेत्र बांद्रा ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. या कार्यक्षेत्रात काही संस्थानी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. या अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश घेवू नये. अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यासाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील, असे श्रीमती उर्मिला पारधे, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम यांनी प्रसिद्धी पत्राकान्वये कळविले आहे.
अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे :- 1). के.पी.पूर्व, दि. प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कुल, अंधेरी (पुर्व), 5वी ते 10 वी इंग्रजी 2). के.पी.पश्चिम, इत्तेमाद इंग्लिश हायस्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी 3). के.पी.पश्चिम, जे.के. पब्लिक स्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी या आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 3:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY