नाशिकमध्ये राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेट. राजकीय चर्चांना उधान

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर, चंद्रकांत पाटील हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी या दोन्ही नेत्यांची नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. या वेळी चर्चा नेमकी कशावर झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. . त्यात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे सोबत युतीचे संकेत दिलेले असताना आज सकाळी या दोन्ही नेत्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट झाली आहे. या उभ्याने झालेल्या भेटीमुळे मनसे-भाजप युतीबाबत पुन्हा अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.
राज्यात महाआघाडी सरकार असल्यामुळे राज ठाकरे आक्रमक होत आहेत त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप बरोबर त्यांची युती होईल, अशी चर्चा आहे. विशेषत: येऊ घातलेल्या मुंबई आणि नाशिक, पुणे महापालिकेत, अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही उतरणार म्हटल्यानंतर नाशिकमध्येच युतीची पायाभरणी होणार अशी चर्चा सुरू झाली होती.
यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व राज्याला हवे आहे, असे सांगताना त्यांचे कौतुक केले होते. मात्र, त्याचबरोबर ते परप्रांतीयांचा मुद्दा सोडत नाही, तोपर्यंत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 18, 2021, 2:20 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY