खा. विखे रेमडेसिविर प्रकरण : १५ दिवसांत शिर्डीत आलेली खासगी विमाने आणि कार्गो याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करा..
औरंगाबाद : नगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याच्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. भाजप खासदार डॉ. विखे पाटील हे चार्टर्ड विमानाद्वारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे बॉक्स दिल्लीहून शिर्डीला आणून शकत होते आणि ते बॉक्स कुठे आहेत? खंडपीठाने व्हिडीओमधील पाटील यांच्या दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विखे पाटील यांनी गुपचूप रेमडेसिव्हिरचा साठा दिल्लीहून खरेदी केल्याचा आरोप आहे. यावर खंडपीठाने म्हटले आहे की, “व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये खासदारांनी त्यांच्या प्रवासात आणि शिर्डी विमानतळावर लँडिंग करताना अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये इंजेक्शन वितरीत केल्याचे दाखवत आहेत, हे सत्य नाही का? आणि यात पुढे तपास होऊ नये का?”त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी शिर्डी विमानतळ येथील १० एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२१ पर्यंतच्या सर्व खासगी विमानांच्या वेळा, त्यांतून वाहतूक करण्यात आलेल्या साहित्यांची खोकी/माल याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन जतन करण्याचे आदेश दिले. नगरचे जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना खा. विखे यांनी विमानाने १० हजार इंजेक्शन आणले. यावर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 30, 2021, 2:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY