Breaking News

जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 16, 2021 1:11 pm
|

परळी : भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. याकरिता जन आशीर्वाद यात्रेसाठी सकाळी 9 च्या आसपास केंद्रीय मंत्री भागवत कराड परळीत दाखल झाले. साडे नऊच्या आसपास ते पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीच आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 16, 2021, 1:11 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *