Breaking News

खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही ; चंद्रकांत पाटलांचं गृहमंत्र्यांना खुल चॅलेंज

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 18, 2021 8:39 pm
|

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्यावरुन भाजप नेत्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले. तुम्ही पण खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, गुन्हा दाखल करा, घाबरत नाही आम्ही. अनिल देशमुख असेच धमक्या देत गेले, असा इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिलीप वळसे-पाटलांना दिला. यावेळी त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला. केंद्रावर खोटे आरोप करुन राजकारण सुरु आहे. राजकारण थांबवा आणि लोकांचे जीव वाचवा. लोक संतापले आहेत. सरकार विरोधात जनतेचा उद्रेक होईल, कोरोना काळात सत्ताधाऱ्यांनी असे राजकारण करणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणे थांबवावे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील ?

शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन मोठा राजकीय गोंधळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आज ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे ते म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 18, 2021, 8:39 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *