….महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही! राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट
मुंबई – ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची (Jamil Shaikh Murder Case)भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली होती. या आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. या प्रकरणी शरद पवार यांनी ह्या प्रकरणाची दखल घ्यावी याकरिता राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते .
राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे. #जमीलशेख_हत्या #RajThackerayLive
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2021
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास करून एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपीने राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला (Najib Mulla) यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर राज ठाकरे (Raj Tjackeray ) यांनी आता या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत नजिब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. अशी जर मंडळी यांना पक्षात सांभाळायची असतील तर दुसऱ्यांचे हात काही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही, असा इशारा दिला आहे. तसेच याच नजिब मुल्ला यांचं नाव सूरज परमार यांच्या हत्या प्रकरणात आलं होतं. . ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावं असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज्य सरकार काय कारवाई करतं ते पाहावं लागेल,
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 2:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY