कोरोना नियमावलीचे पालन न केल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका
नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु, आशिया खंडात असे काही देश आहेत जेथे अजूनही कोरोनाचे नवीन प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात जास्त नवीन रुग्ण भारतात आढळले आहे. त्यामुळे देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. तर दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. यामुळे देशातील वातावरण चिंताजनक बनत चाललं आहे. केंद्र सरकारने संबंधित राज्यांना कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सांगितले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते, असा इशारा कोरोनाच्या रोगाशी संबंधित सरकारच्या पॅनेलमध्ये सामील वैज्ञानिक, प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत दररोज रुग्णसंख्या तुलनेने कमी असेल, पण जर नवीन कोरोना स्ट्रेन आला तर तिसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग झपाट्याने पसरू शकतो. प्राध्यापक अग्रवाल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तीन सिनेरियो तयार केले आहेत. एक आशावादी आहे. यात आमचा विश्वास आहे की ऑगस्टपर्यंत जीवन सामान्य होईल आणि नवीन कोणताही म्युटेंट तयार होणार नाही. दुसरा ज्यात आम्ही असे मानतो की लसीकरण 20% कमी प्रभावी आहे. आणि तिसऱ्यात आम्ही मानतो की, नवीन व्हेरिएंट येऊ शकतो आणि ज्यामुळे 25 टक्के जास्त प्रसार होईल. पण तो डेल्टा प्लस व्हेरिएंट नसेल असेही त्यांनी सांगितले.
देशात आतापर्यंत कोरोनाचे 3.05 कोटी रुग्ण आढळले असून यात 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 80 हजार लोकांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, रिकव्हरी रेट 96.97% असून आतापर्यंत 2.96 कोटी उपचार घेत बरे झाले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 8:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY