संपूर्ण लॉकडाउनची आवश्यकता नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत तीव्र वाढ झाली आहे. आता देशात कोरोना संसर्गाची परिस्थिती स्फोटक बनली आहे. बर्याच राज्यांत ही परिस्थिती भयंकर आहे. बुधवारी भारतात कोरोनाचे सर्वाधिक 1.15 लाख रुग्ण आढळून आले आहेत, तर 630 लोकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) संध्याकाळी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करणार केली या बैठकीत कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाविषयी चर्चा केली जाईल. देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान केंद्र सरकार सातत्याने राज्यांशी संपर्कात आहे. कोरोना नियंत्रणासाठी आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, असं मत मोदींनी व्यक्त केल आहे.
I appeal to you all to stress on COVID19 testing. Our target is to do 70% RT-PCR tests. Let the number of positive cases come high, but do maximum testing. Proper sample collection is very important, it can be checked through proper governance: PM Modi during meeting with CMs pic.twitter.com/Ml35BVLY3q
— ANI (@ANI) April 8, 2021
कोरोनाची दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहता बर्याच राज्यांनी रात्रीचे कर्फ्यू लादले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (8 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या कालावधीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
I appeal to you all to stress on COVID19 testing. Our target is to do 70% RT-PCR tests. Let the number of positive cases come high, but do maximum testing. Proper sample collection is very important, it can be checked through proper governance: PM Modi during meeting with CMs pic.twitter.com/Ml35BVLY3q
— ANI (@ANI) April 8, 2021
मागच्या 24 तासांत महाराष्ट्रात 59 हजार 907 नवीन रुग्ण समोर आली आहेत, तर 322 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी दिल्लीत साडेपाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण समोर आले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यूपीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे सुमारे 6 हजार रुग्ण आढळले आणि 40 जण मरण पावले. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत, तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 8:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY