नितीन चंद्रकांत देसाईंच्या ND स्टुडिओला भीषण आग, ‘जोधा अकबर’चा सेट आगीत जळून खाक
कर्जत : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओला भीषण आग लागली आहे.जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्तीच्या गोडाऊनला आग लागली.
कर्जत नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोळ उंच आकाशामध्ये पसरल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याचा सेट जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय.मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही.दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडीओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे माेठ्या प्रमाणातील जीवीत हानी टळली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 6:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY