जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर…. नितेश राणे यांची संजय गायकवाडांवर जहरी टीका
मुंबई :महाराष्ट्रात शनिवारी ६७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राजकारण मात्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आरोप करताना त्यांची भाषा घसरली होती.
“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..— Nitesh Rane (@NiteshNRane) April 18, 2021
दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटद्वारे हल्लाबोल केला आहे. “ऑक्सिजन नसल्यामुळे कांदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 18, 2021, 8:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY