Breaking News

नवीन कोरोना विषाणूचा बदलत्या गुणधर्माबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने मार्गदर्शन करावे. :आरोग्यमंत्री राजेश टोपे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 17, 2021 9:30 pm
|

मुंबई: गेल्या सलग तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होत चालली आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांची कमतरता जाणवू लागली असून, बेड्स आणि ऑक्सिजन यांची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला केली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली. कोरोना विषाणुची जनुकीय संरचना बदलली का, याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील ११०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून दिला जाणार आहेतसेच .हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात १३२ प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत. तसेच रेमडेसीवरील निर्यात बंदीमुळे १५ कंपन्यांच्या आहे, जो साठा शिल्लक आहे त्यातील अधिकाधिक महाराष्ट्राला मिळावे, अशीही मागणी टोपे यांनी यावेळी केली.नवीन कोरोना विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने मार्गदर्शन करावे.आदी मागण्या यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 17, 2021, 9:30 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *