Naxal Attack: छत्तीसगडच्या बीजपूर येथील नक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद
छत्तीसगड: बस्तरच्या बीजापुरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी 700 जवानांना घेरुन हल्ला केला. बीजपूर एसपींनी सांगितले की, ग्राउंड झीरोचा व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये 22 जवानांचे मृतदेह घटनास्थळी दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वी छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,ज्या ठिकाणी चकमकी झाली त्या भागात नक्षलवाद्यांच्या फर्स्ट बटालियनचा परिसर आहे. 20 दिवसांपूर्वी यूएव्ही छायाचित्रांमधून मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांची उपस्थितीची माहिती मिळाली होती
डीजी डी.एम. अवस्थी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ जवानांचं पार्थिव आतापर्यंत सापडल्याचं सांगण्यात येत आहे.या बीबीसीने या वृत्तवाहीनीने दिलेल्या वृतानुसार सैनिकांचे मृतदेह एक किलोमीटरच्या परिघात अनेक ठिकाणी पडले होते, त्यांना एसटीएफच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिक शहीत झाल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. शूर हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. अमित शाह हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. आज शाह यांच्या 3 प्रचार रॅली होणार होत्या पण त्यातील एकच रॅली पार पडली. त्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करुन शाह दिल्लीला परतले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 4, 2021, 6:01 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY