Breaking News

महत्वाची बातमी! : कोरोना योद्ध्यांना सिडकोच्या योजनेतून नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 14, 2021 2:33 pm
|

नवी मुंबई: भारतात उद्या 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचा आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील कोरोना संकट परतवून लावण्यासाठी अवितरपणे झटणाऱ्या कोरोना योद्धयांसाठी सिडकोने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना योद्ध्यांना (Corona Warriros) नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोना युद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी दिले होते. या आदेशानुसार, सिडकोच्या योजनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईत जवळपास साडेचार हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्राकडून राज्य सरकारांना पत्र लिहले आहे. ज्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि कोरोनामुक्तांना आमंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच परिसरांमध्ये ही घरे असतील.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 14, 2021, 2:33 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *