ठाणे महानगरपालिकेतर्फे उभा रहात असलेला ऑक्सिजन प्लांट आठवड्याभरात होणार कार्यान्वित
ठाणे : – शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास कंपनी मधील कोव्हिड केअर सेंटर्स लवकरात लवकर सूरु करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही कोव्हिड केअर सेंटर मधील कामाचा आढावा घेतला. ज्युपिटर हॉस्पिटल जवळील पार्किंग प्लाझा कोव्हिड केअर सेंटरची 200 आयसीयू बेडस आणि 800 ऑक्सिजन बेडस अशी सुमारे 1000 रुग्णांना सेवा देण्याची क्षमता आहे. हे कोविड केअर सेन्टर मर्यादित स्वरूपात कार्यान्वित असून आजमितीस या सेंटरवर 375 सौम्य लक्षण असलेले पेशंट्स उपचार घेत आहेत.
ऑक्सिजन प्लांट आठवड्याभरात होणार कार्यान्वित
पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरच्या मागच्या बाजूस ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारल्या जात असलेल्या ऑक्सिजन जनरेशन आणि डिस्ट्रिब्युशन प्लांटला आज श्री. शिंदे यांनी भेट दिली. आयरॉक्स कंपनीमार्फत हा प्लांट उभारला जात असून या प्लांट मधून दररोज 47 लिटरचा एक जम्बो सिलेंडर यानुसार 175 जम्बो सिलेंडर रिफिल करून पुरवठा करण्याची क्षमता आहे. या प्लांट मधून तयार केलेला ऑक्सिजन या कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना वापरता येणार आहे. हे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. तसेच या प्लांटची क्षमता दुप्पट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. हा प्लांट सुरू झाल्यास कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सूरु करण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 7:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY