Breaking News

“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई महानगर पालिका जबाबदार?

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 10, 2021 1:57 pm
|

file photo

मुंबई : मान्सूनने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जोरदार हजेरी लावून मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पहिल्या पावसामध्येच सखल भागात पाणी साचून काही तासांकरता ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर यामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे दिसले . या पार्श्वभूमीवर यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि महानगपालिकेच्या भोंगळ कारभारावर पुन्हा ताशेरे ओढले आहेत.

‘मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील.’ असे शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब म्हणाले होते. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही राज्य सरकार तसेच महापालिकेवर टीका केली आहे. “आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई महानगर पालिका जबाबदार? हे त्यांनी सांगावं!” असा सवाल दरेकर यांनी अनिल परब (Anil Parab) यांना विचारला आहे.

“प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नसल्याने समुद्राची भरती व मुसळधार पाऊस आला, म्हणून पाणी तुंबले असे सागत आहात. मुंबईसाठी २०-२५ वर्षे समुद्राची भरती, मुसळधार पाऊस हा काही नवीन नाही. आता तुंबलेल्या पाण्याची जबाबदारी मनपाने घ्यावी आणि तत्काळ उपाययोजना करावी. तसेच तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था उभी करावी व नागरिकांचे जनजीवन सुरळीत करावे.” असे दरेकर म्हणाले.

दरवेळी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करुन मुंबईला सावरा आशी विनंती भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार आणि नालेसफाईमध्ये केलेल्या हाथ सफाईमुळे मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 10, 2021, 1:57 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *