45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण बंद ,मुंबई महापालिकेने लसींच्या तुटवड्यामुळे घेतला निर्णय
मुंबई : कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेशा लसींची उपलब्धता नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे आज लसीकरण होणार नाही. . नवा साठा आल्यानंतरच या वयोगटातील नागरिकांना दिली जाईल. लसीचा साठा किती आहे ते पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच नागरिकांना कळवले जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर पालिकेने ठरवून दिलेल्या 5 केंद्रांवर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
रविवारी, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी 2427 जणांना कोरोनाची लस दिली गेली. महापालिकेने असे म्हटले आहे की, आम्हाला लसीचा पुरेसा पुरवठा आलेला नाही. त्यामुळेच 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार नाही आहे. यापूर्वी सुद्धा लसीचा तुटवडा भासत असल्याने याच वयोगाटातील लसीकरण मोहिम 30 एप्रिल ते 2 मे पर्यंत थांबवण्यात आले होते.आजच्या दिवसासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर फक्त 500 डोसच उपलब्ध आहेत. त्यामुळे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आल्यास त्यांना तेथे परवानगी दिली जाणार नाही आहे. यासाठी नागरिकांनी रजिस्ट्रेशन करुन तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर यावे अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली आहे.
मुंबईतील फक्त ‘या’ 5 केंद्रावर होणार लसीकरण
बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)
वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर
Dear Mumbaikars
A few important reminders
– Vaccination only for 18-44 year olds today
– Only 18-44s who have booked a slot will be administered vaccine
– No walk-ins at centres
– 45 and above due for second dose will be updated about dates eventually
– Carry ID please https://t.co/15AO4uuhwo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 3, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 3, 2021, 12:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY