Breaking News

“आमच्यावर हसवण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?”

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 7, 2021 1:43 pm
|

मुंबई: बृहन्मुंबई महा महानगरपालिका (बीएमसी) मुंबईत कोरोनाच्या वेगात ब्रेक लावण्यात यशस्वी ठरली आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने कमी झाली आहे. रूग्णालयात पोहोचण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी बीएमसीने नागरिकांच्या दारात जाऊन त्यांना शोधण्याची पद्धत वापरली. अचूक नियोजनामुळे कोरोना आता येथे अधिक नियंत्रित होत आहे. दरम्यान , बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या या कामाचे कौतुक देखील केले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुंबई मॉडेलसारख्या इतर काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन आमच्यावर हसवण्याचेच ठरवले असेल तर मुंबई मॉडेल आम्ही देशाला कसे समजवून सांगणार? अशी प्रतिक्रिया आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

करोनाच्या वाढत्या समस्येवर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर “मुंबई मॉडेल” इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मांडले आहे. मुंबईत आधीच करोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी करत असल्याचे चहल यांनी सांगितले. अधिक जांबो सुविधा असलेले जवळजवळ ५,५०० बेड्स उपलब्ध करत आहोत त्यातील ७० टक्के हे ऑक्सिजन बेड्स असतील अशी माहिती महापालिकेचे आयुक्त चहल यांनी दिली.

सुरुवातीला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मुंबईतील रूग्णांची संख्या वाढत होती. 10 फेब्रुवारीपर्यंत शहरात एकूण 3 लाख 13 हजार लोक संक्रमित झाले होते. 76 दिवसात ही संख्या 6 लाख 22 हजारांवर पोहोचली. 10 फेब्रुवारी रोजी मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केली तर एकूण 11 हजार 400 मृत्यू होते. 25 एप्रिल रोजी ही संख्या 12 हजार 719 वर पोहोचली. या काळात 1 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला. येथे मृत्यूचे प्रमाण 0.04 टक्के आहे. हा मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे.

असा आहे मुंबई पॅटर्न

प्रायव्हेट रुग्णालयांच्या 80 टक्के बेड्सवर महापालिकेचे नियंत्रण.

सर्व पालिका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली.

‘चेस द व्हायरस’ अंतर्गत प्रत्येक घरात जाणून टेस्टिंग केली.

प्रत्येक विभागात ‘वार्ड वॉर्ड रुम’ बनवली. सर्व बेड्स अशाप्रकारेच मॅनेज करण्यात आले.

सेंट्रलाइज ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था करण्यात आली.

गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टीमध्ये जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली.

जंबो कोविड सेंटर्समध्ये 9000 बेड्स तयार करण्यात आले.

60 टक्के बेड्समध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

दररोज 40 ते 50 हजार लोकांची टेस्टिंग झाली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 7, 2021, 1:43 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *