मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय;अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार
मुंबईः मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा झटका (blow) दिला आहे . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका मुंबई उच्च नायालयाने दाखल केली होती. जयश्री पाटील यांनीही याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणाशिवाय अन्य तीन याचिकांवरही सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयनं १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने आज दिला आहे.
खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, अॅड. जयश्री पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेऊन कायद्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही हायकोर्टाने आदेशात केले स्पष्ट केले असून इतर याचिका कोर्टानं निकाली काढल्या आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 5, 2021, 2:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY