Breaking News

Mumbai Weather Forecast: मुंबई शहर, उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 10, 2021 1:27 pm
|

मुंबई : दक्षिण-पश्चिम मान्सूनचे बुधवारी मुंबई जोरदार आगमन झाले. बुधपारी पहाटेपासून दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले. पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल (Kings Circle) परिसरात पाणी साचले आहे. मुंबई लोकल बंद (Mumbai local closed)असल्याने नोकरदार वर्गानं रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला . त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर (west expressway) वाहतूक कोंडी झाल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या . या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईतील पश्चिम उपनगर म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाला. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरू असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. वसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सूनमुळे समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. आज सकाळपासून समुद्र खवळलेला दिसत असून, समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 15 पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरफचे अधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 10, 2021, 1:27 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *