पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ, तृणमूल खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद घेऊन फाडला
नवी दिल्ली :पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. गुरुवारी, विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस हेरगिरी घोटाळ्यासह अनेक विषयांवर निदर्शने केली. दरम्यान ,संसद सुरू झाल्यानंतर लगेचच लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. यानंतर दोन्ही सदनांची कार्यवाही पुन्हा दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. ही तिसरी वेळ होती जेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यापूर्वी सकाळी कारवाई सुरू परंतु गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावी लागली होती. दुसरीकडे लोकसभेची कार्यवाही देखील आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
दरम्यान, आयटी मंत्री जेव्हा पेगासस विषयावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी आयटी मंत्र्यांच्या हातातील निवेदन पत्रक हिसकावून ते फाडले आणि हवेत फेकले. यादरम्यान, गोंधळ सुरू असताना आयटी मंत्री सतत बोलत राहिले, परंतु त्यांना त्यांचे मत पूर्णपणे मांडता आले नाही. यानंतर भाजप आणि तृणमूलचे खासदार यांच्यात जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मार्शल बोलवावे लागले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 22, 2021, 7:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY