मोदी सरकारची पुणेकरांना ‘थेट’ भेट ,महापौरांनी मानले आभार
पुणे : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आरोग्य यंत्रणा देखील अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शनिवार-रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.दरम्यान, महाराष्ट्र सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून आणि लॉकडाउनवरून राजकारण रंगल्याचं दिसतंय. एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरु केला आहे. या लसीचा पहिला हफ्ता शुक्रवारी पुण्यात दाखल झाला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही खुशखबर पुणेकरांना दिली आहे.तर , महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे.
धन्यवाद, @narendramodi सरकार !
केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 9, 2021
महाराष्ट्रात सध्या भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील अंदाजे ६०% कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातही सगळ्यात वरती आहे तो पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्र सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद आणखी वाढणार अशी चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत. यानंतर त्यांनी मोदी सरकारचे आभार देखील मानले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 10, 2021, 12:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY