काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
देशात पुन्हा एकदा करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत असून अनेक राजकीय नेत्यांनाही लागण होत आहे. नुकतंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी सांगितले की, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा”.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केरळ, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये त्या प्रचारसभा घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाढता कोरोना पाहता बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व रॅल्या रद्द केल्या होत्या.
देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण रुग्ण : 2.56 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 1,757
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :1.75 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.53 कोटी
आतापर्यंत बरे झाले : 1.31 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू :1.80 लाख
सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 20.24 लाख
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 20, 2021, 8:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY